भाजपने  राज्य सरकारला दिला इशारा, BJP warns state government,

Share This News

विजेचे कनेक्शन कापून लोकांना
लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर येण्यास भाग पाडू नका

नागपूर ः कोरोनाच्या संकटात लोकांवर लॉकडाऊन लादले जातेय. सोबतच लोकांची वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा लावून राज्य शासन लोकांना लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर येण्यास भाग पाडत आहे. यामुळे आंदोलनाचा उद्रेक होईल आणि त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळावर राहील, अशा इशारा भाजपचे नेते व माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बोलताना दिला.


राज्य सरकारने वीज बिल थकबाकीदारांच्या जोडण्या कापण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर बोलताना बावनकुळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाच्या संक्रमणामुळे भाजपने आपले जेलभरो आंदोलन स्थगित केले. मात्र, सरकारला कुठलीही फिकीर नाही. त्यांना आंदोलन हवे आहे. वीज जोडण्या कापून लॉकडाऊनमध्ये लोकांना रस्त्यावर येण्यास भाग पाडले जात आहे. शेतकपिकांना शेवटचे पाणी हवे असताना शेतकऱ्यांच्याही वीज जोडण्या कापण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून आजपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होईल. या काळात कोरोनाचे संक्रमण वाढल्यास त्याला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जबाबदार राहील.
सरकारने कृषीधोरण २०२० जाहीर केले. मार्च २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना जुन्या थकबाकीसंदर्भात मुभा देण्यात आली. त्यासाठी चालू बिल भरावे लागेल, असेही सांगण्यात आले. कोणाचेही वीज कनेक्शन कापणार नाही, असे आश्वासन दिले गेले. प्रत्यक्षात वेगळेच घडत आहे. एकीकडे हे धोरण जाहीर करताना दुसरीकडे सर्रास वीज जोडण्या कापणे सुरु झाले आहे, असे बावनकुळे म्हणाले.
कोरोना संक्रमणाच्या काळात सरकार एकीकडे लॉकडाऊन लावून लोकांचे सहकार्य मागत आहे. तर दुसरीकडे लोकांना रस्त्यावर आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत. आमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आम्ही ४२ लाख शेतकऱ्यांपैकी एकाचीही जोडणी कापली नाही. तर आता थकबाकी दीडपट दंड व्याजाची सावकारी वसुली सरकारकडून सुरु आहे, याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.