बेताल नवाब मलिकांविरुद्ध भाजपची पोलिस तक्रार..तर न्यायालयात जाणार

Share This News

मुंबईः केंद्र सरकारविरुद्ध कथित खोटे आरोप केल्या प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध भाजपच्या वतीने दिंडोशी पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रारीवर कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवारी मलिक यांच्याविरुद्ध दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रेमडेसीवीर कंपन्यांनी महाराष्ट्राला इजेक्शन्सचा पुरवठा करू नये, यासाठी केंद्र सरकार कंपन्यांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला होता. त्यावर भाजपने अतिशय तीव्र प्रतिक्रिया देऊन त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. राज्यातील कोरोनाग्रस्त जनतेला दिलासा देण्याऐवजी राज्यातील मंत्री या पद्धतीची बेजबाबदार वक्तव्ये करून जनतेमध्ये दहशत व घबराट पसरविण्याचे काम करीत असल्याचा भाजपचा आरोप आहे. मलिक यांचे आरोप केवळ खोटेच नाही तर समाजहिताला नुकसान पोहोचविणारे असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. पोलिसांनी मलिक यांच्यावर कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात अपिल करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.