वॅलेनटाईन डे दिवशी मेडिकलच्या विद्यार्थ्यांसह दीडशे जणांचे रक्तदान

Share This News

नागपूर : महत्त्वाचा दिवस असलेल्या ‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) कर्करोग विभाग, रक्तपेढी आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने फुटाळा तलाव परिसरातरक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात जोडीने आलेल्या सुमारे दीडशे युवांचे रक्तदान करून समाजापुढे नवीन आदर्श ठेवला. बाल कर्करोग दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रत्येक वर्षी वॅलेनटाईन डे दिवशी फुटाळा तलाव परिसरात तरुण-तरुणींची गर्दी उसळते. या तरुणांची संख्या बघता कर्करुग्णांसाठी रक्त गोळा करण्याकरिता मेडिकलतर्फे येथे रक्तदान शिबीर घेतले जाते. यंदाही रक्तदान शिबिरासाठी मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून येथे पेंडालटाकण्यासह रक्तदानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती, तर मेडिकलचे विद्यार्थी स्वतः परिसरात फिरून जोडीने फिरणाऱ्या तरुण- तरुणीला रक्तदानाचे महत्त्व सांगत रक्तदानासाठी आवाहन करत होते.


करोनामुळे रक्तदान शिबिराची गती मंदावली आहे. परंतु या रक्तदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हे रक्त मेडिकलमधील रक्ताची गरज असलेल्या कर्करुग्णांसह इतरही अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरले जाणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. क्रिष्णा कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. अशोक दिवान, डॉ. जांभुळकर, डॉ. संजय पराते, समाजसेवा अधिक्षक किशोर धर्माळे उपस्थित होते . तर शिबिरासाठी प्रवीण कन्स्ट्रकशनकडूनही मदत गेली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.