बंगालमधील हल्ले: भाजप उद्या करणार राज्यस्तरीय आंदोलन

Share This News

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेले अनन्वित अत्याचार, हिंसाचार याविरोधात भाजपच्या वतीने उद्या कोरोना विषयक नियमांचे पालन करीत राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाची एक बैठक मंगळवारी ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेले अनन्वित अत्याचार, हिंसाचार याविरोधात उद्या कोरोनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करीत, सोशल डिन्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत राज्यव्यापी आंदोलनाचे नियोजन करण्यात आले. संपूर्ण देशभरातील भाजप पश्चिम बंगालच्या कार्यकर्त्यांसोबत आहे. आज पश्चिम बंगालमध्ये अतिशय विदारक चित्र आपण पाहतो आहोत. कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत, घरांवर हल्ले केले जात आहेत. विविध ठिकाणी लूट केली जात आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. आज स्वत:ला लिबरल म्हणविणारे गप्प का आहेत?असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.