‘ब्रेक द चेन’मुळे शेतकर्‍यांच्या संकटात भर

Share This News

आठवडी बाजार बंद झाले तसे व्यापारी भाजीपाला कमी दरात मागणी करत आहेत. सरासरी भावापेक्षा अध्यार्हून कमी दराने भाव पाडून मालाची मागणी करत असल्याने उत्पादन खर्च निघेना झाला आहे. ग्राहकांची संख्या मंदावली असून कोरोना होण्याच्या भीतीने ग्राहक बाजारात येण्यास टाळाटाळ करत आहेत. हंगामी पिके घेत असताना दैनंदिन गुजराण होण्यासाठी भाजीपालासारखे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. आठवडी बाजार बंद झाल्याने ग्रामीण अर्थकारणाला खीळ बसली असल्याचे एका शेतकर्‍याने सांगितले.आठवडी बाजार बंद, शेतमाल विक्रीची समस्यागोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने नियम अधिक कडक करताना ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच आठवडी बाजार बंद झाल्याने शेतकर्‍यांपुढे भाजीपाला विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापारी कमी दराने मागणी करत असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडले आहे. गतवषार्पासन कोरोनाचे संकट सुरू झाले आहे. मध्यंतरीच्या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र आता गत महिन्यापासून पुन्हा संसर्ग वाढू लागला आहे. कोरोनाने ग्रामीण भागाला विळखा घातला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. सध्या हॉटेल व्यवसायावर ग्राहकांच्या उपस्थिती संदर्भात निबर्ंध लावण्यात आले आहे.
त्यामुळे खवय्यांची हॉटेलमध्ये गर्दी कमी झाली आहे. त्याचबरोबर आठवडी बाजारही बंद करण्यात आले आहेत. तालुका मुख्यालय आणि इतर मोठ्या गावांमध्ये भरणार्‍या आठवडी बाजारांत लहानमोठे व्यावसायिक, शेतकरी, भाजीपाला उत्पादक आठवडी बाजारात भाजीपाल्याची तसेच अन्य साहित्याची खरेदी-विक्री करत असतात. मात्र आठवडी बाजार बंद पडल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. ग्रामीण भागातील असंघटित क्षेत्रातील कामगार शहरात येऊन अथवा बांधकामावर मजुरी करतात. त्यावर त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह असतो. मात्र आता हाताला काम नसल्याने मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांसह मजूरही संकटात सापडले आहेत.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.