ब्रेकिंग – चिंता वाढली! कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दिल्लीत 72 डॉक्टर पॉझिटिव्ह

Share This News

दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून ‘एम्स’ रुग्णालयातील 35 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते. याआधी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चिंता वाढली आहे.

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य नागरिकांसह रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांनाही कोरोनाची वेगाने लागण होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. अशातच कोरोनावरील लसीचे दोन डोस घेतल्यानंतर गंगाराम रुग्णालयातील 37 डॉक्टर आणि एम्समधील 35 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. डीएस राणा यांना तातडीने भेटायला बोलावले आहे. मुख्यमंत्री रुग्णालय आणि कर्मचाऱ्यांच्या स्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. आज सायंकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे.

पाच दिवसातील आकडा भितीदायक

दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोना पुन्हा वाढत आहे. गेल्या पाच दिवसातील आकडा भितीदायक आहे. दिल्लीमध्ये 4 एप्रिलला 4033, 5 एप्रिलला 3548, 6 एप्रिलला 5100, 7 एप्रिलला 5506 आमि 7 एप्रिलला 7437 रुग्ण आढळले होते. रुग्णांसह मृतांचा आकडाही वाढत आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.