राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा अखेर रद्द, राज्य सरकारचा निर्णय

Share This News

मुंबईः राज्यातील कोरोनाचे संकट अधिकच गंभीर बनल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापानाच्या आधारे लावण्याचा विचार सुरु असून त्याबाबतचे निकष लवकरच जाहीर केले जाणार आहेत.
मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली. या बैठकीत एकूणच परिस्थितीवर चर्चा होऊन दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर बारावीची परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय कायम आहे. या परीक्षेबाबत मे अखेरीज परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावला जाणार असून त्याचे निकष लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा करताना सांगितले.
सीबीएसई बोर्डाने देखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.