सुशांतच्या जन्मदिनी चाहत्यांनी दिला आठवणींना उजाळा
Brighten the memories given by Sushant's birthday fans
मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज जन्मदिन. या निमित्ताने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. तर सुशांत ची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने ही सुशांत बरोबरचे फोटो शेअर करून गोड आठवणी जागवल्या आहेत. ती म्हणाली की, सुशांतचा जन्मदिवस आपण प्रेम वाटून साजरा करूया. चाहत्यांनी त्याच्या गाण्यांवर डान्स करुन व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करा. आजच्या दिवशी आपण त्याच्या आठवणी ताज्या करून जल्लोष साजरा करु. सुशांत सिंह राजपूत हा १४ जून २०२० रोजी राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. मात्र सुशांतची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला . मात्र अद्यापही हा तपास सुरूच आहे.
Brighten the memories given by Sushant's birthday fans