पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात बीएसएफ अधिकारी शहीद

Share This News

मंगळवारी पाकिस्तानच्या सैन्याकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये असणार्‍या पूंछ जिल्ह्यातील शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी शेजारी राष्ट्राच्या सैन्याने गोळीबारही केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमधील अधिकारी शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
बीएसएफकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार मेंढर सेक्टरमधीर तारकुंडी येथील नियंत्रण रेषा परिसरात पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. एसएचओ मंजूर अहमद कोहली यांनी बीएसएफ सब इन्स्पेक्टर पॉऊटीनसॅट गुईट शहीद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. शहीद अधिकारी हे बीएसएफच्या ५९व्या बटालीयनचा भाग होते.
सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पाकिस्तानच्या गोळीबाराचे भारताकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.