बजेट देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा ठरणार,’शंखनाद’च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत मान्यवरांचे मनोगत | Budget will be a boon to the country’s economy, dignitaries discuss ‘Shankhanad’ budget

Share This News

कोरोनाच्या संकट काळातील हे पहिले बजेट देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारा ठरणार असल्याचं मनोगत अर्थव्यवस्थेच्या जाणकारांनी केलं. ‘शंखनाद’च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत उपस्थित मान्यवरांनी यंदाचा बजेटचे स्वागत केले. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स या संस्थेचे नागपूर विभागाचे अध्यक्ष सीए किरीट कल्याणी व अर्थविषयक आणि रेल्वे विषयांचे अभ्यासक डॉ प्रवीण डबली या विशेष चर्चेत सहभागी झाले होते. गेल्यावर्षीच्या कोरोना काळानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे मोठे आवाहन सरकारपुढे होते. या आव्हानांचा सामना करीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प मांडल्याचे या तज्ज्ञांनी सांगितले. कृषीविषयक सुधार करण्याची मोठी घोषणा या बजेट मध्ये करण्यात आली,दीडपट हमीभाव देण्याची घोषणा देखील करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलनाच्या पार्शवभूमीवर या बजेटमध्ये सरकार कृषीविषयक मोठी घोषणा होण्याची शक्यता होती त्यानुसार बजेटमध्ये या घोषणा झाल्याचे डॉ प्रवीण डबली सांगतात. तर आयकर मध्ये काही बदल होणे अपेक्षित होते परंतु सरकारने आयकरात कुठलेही बदल केले नाही,कारण कोरोना संकटातून बाहेर पाडण्यासाठी सरकारला निधी उभा करायचा आहे यामुळे आयकरात कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचं सीए किरीट कल्याणी सांगतात. पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर यंदाच्या बजेटमध्ये अधिक भर देण्यात आला आहे. या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या संधी असल्याचं या तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं. नेहमीच्या बजेटमध्ये दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे आरोग्य क्षेत्र,परंतु कोरोना मुळे यंदाच्या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्राच्या निधीत मोठी  वाढ करण्यात आली आहे हा बजेटचा लक्षवेधी गन असल्याचं तज्ज्ञ सांगतात. एकूणच पाहता कृषी,शिक्षण,आरोग्य,कर प्रणाली अशा सर्वच मुद्द्यांवर बजेटमध्ये विशेष लक्ष देण्यात आले असून हा बजेट विन-विन पोजिशनचा असून १० पैकी ७ गुण या बजेटला देत असल्याचं तज्ज्ञांनी ‘शंखनाद’ च्या विशेष कार्यक्रमात सांगितलं.  


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.