बुलढाणा : महागाईच्या विरोधात महिला राकांपा चे चौकात चूल मांडुन आंदोलन
राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी व इतर पक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी कडून बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरामध्ये भरचौकात चूल मांडून जेवण तयार करून केंद्र सरकारचा ईंधन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चुल मांडून जेवण तयार करून वितरित करण्यात आले यावेळी गॅस सिलेंडरला हार अर्पण करून त्याला श्रद्धांजली देऊन निषेध व्यक्त करण्यात आला