भरचौकात तलवारीने केक कापणाऱ्यांना अटक
नागपूर : परिसरात दबदबा निर्माण करण्यासाठी भरचौकात तलवारीने केक कापणाऱ्यांना दोन आरोपी युवकांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, अंबाझरी पोलिस ठाण्यातील डी.बी. पथक दिवसपाळी कर्तव्यावर असताना सहा. पोलिस उपनिरीक्षक आशिष कोहळे, नायक पोलिस शिपाई संतोष वानखेडे, पोलिस शिपाई अमित भुरे, अंकुश घट हे गुन्हेगारांच्या शोधात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना हिलटॉप ऑटो स्टॅण्ड परिसरात काही गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक परिसरात टोळीचा दबदबा निर्माण करण्यासाठी टोळीतील व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त भरचौकात येऊन लोखंडी धारदार तलवारीने केक कापून तो फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याची आणि ते वायरल झाल्याची माहिती मिळाली. यावर त्वरित कारवाई करीत पोलिस पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी आर्यन प्रकाश भेंडे (१९) रा. प्लॉट क्र. १३६५, हिलटॉप ऑटो स्टॅण्डजवळ अंबाझरी आणि ऋषभ राकेश कुमरे (२१) रा. अंबाझरी टेकडी, अजयनगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी धारदार तलवार आणि सत्तूर जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला