पंतप्रधान मोदींवर भांडवलदारांचा दबाव – राज्यमंत्री बच्चू कडू

Share This News

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रामाणिक आहेत. मात्र, त्यांच्यावर विदेशी भांडवलदारांचा दबाव आहे. त्यामुळे शेतकरी मेला तरी बेहत्तर, पण विदेशी भांडवलदार वाचला पाहिजे. याच भूमिकेतून दिल्लीतील शेतकऱयांचे आंदोलन लांबत आहे, असा घणाघात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला.

संभाजीनगर येथे जात असताना राज्यमंत्री बच्चू कडू हे नगर येथे आले होते. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण परदेशी, तिडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केंद्र सरकारवर तोफ डागली.

पंतप्रधान मोदी यांच्यावर विदेशी भांडवलदारांचा दबाव आहे. त्यामुळे ते कृषी बिल मागे घेत नाहीत. या बिलाच्या पाठीमागे केवळ अदानी, अंबानीच नाही तर विदेशी कंपन्या आहेत, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.

आंदोलन मागे घेणे हा अण्णांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याबाबत मी बोलणार नाही. अण्णा आणि आमचे जुने संबंध आहेत; त्यामुळे त्यांची भेट घेणे हा एकच उद्देश होता. कारण माझ्या प्रचारासाठी ते आले होते, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज्यामध्ये शालेय शिक्षणाबाबत स्थानिक परिस्थिती बघून ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.