कृषी कायद्यांवर चर्चेसाठी केंद्र सरकार तयार, सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींची स्पष्ट भूमिका

Share This News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकारचा कृषी कायदा आणि शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार कृषी कायद्याच्या भूमिकेवर ठाम आहे. सरकारला कृषी कायद्यांवर शेतकऱ्यांशी चर्चा करायची आहे, असे मोदींनी स्पष्ट केले. तसेच विरोधकांनीही शेतकऱ्यांशी याबाबत चर्चा करावी, असे आवाहनही मोदींनी केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेस नेता गुलाब नबी आझाद, TMC चे सुदीप बंद्योपाध्याय, शिवसेना खासदार विनायक राऊत, SAD चे बलविंदर सिंह भांडेर हे नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा केली. तर दुसरीकडे JDU खासदार आरसीपी सिंह यांनी केंद्राच्या कृषी कायद्याला समर्थन दिले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार कृषी कायद्याच्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. तसेच विरोधकांनीही शेतकऱ्यांशी याबाबत चर्चा करावी, असे आवाहनही मोदींनी केले.

विनायक राऊतांची महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा 

तसेच या बैठकीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यात महाराष्ट्रातील बीपीएल धारक लोकांना निशुल्क कोरोना लस द्यावी. केंद्र सरकारने सर्व खर्च करावा, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली. )तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने राज्यसरकारसोबत चर्चा करावी. ही स्थगिती उठविण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडावी. महाराष्ट्र बेळगाव सीमा वाद प्रकरणी बेळगावला केंद्र शासित राज्य करावा, असेही विनायक राऊत म्हणाले.

मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही सर्वपक्षीय बठक अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चेसाठी बोलवण्यात आली होती. येत्या सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

दरम्यान संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली. देशाचा वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रांमध्ये चालणार आहे. पहिलं सत्र 15 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.