मध्य रेल्वेने विविध उपक्रमांसह आंतरराष्ट्रीय महिला दिन केला साजरा Central Railway celebrated International Women’s Day with various activities

Share This News

मुंबई, ०९ मार्च : संजीव मित्तल, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी कर्मचार्‍यांवर अवलंबून असलेल्या महिला पाल्यांना शिवणयंत्र, भुसावळ येथील रेल्वे शाळेतील महिला विद्यार्थ्यांना सायकल प्रशिक्षण देण्याकरिता सायकली आणि संगणक प्रशिक्षण व हलके मोटर वाहन चालविण्याचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महिला रेल्वे कर्मचार्‍यांना मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सभागृहात स्टाफ बेनिफिट फंड आणि रेल परिवार देख-रेख मोहीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र वितरित केले.  महाव्यवस्थापकांनी पात्र महिला कर्मचार्‍यांना पुरस्कारही प्रदान केले.  मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आणि मध्य रेल्वे कर्मचारी बेनिफिट फंडचे (सीएसबीएफ) चे अध्यक्ष डॉ. ए के सिन्हा यांनी स्वागतपर भाषण केले तर विनिता वर्मा, मुख्य कार्मिक अधिकारी (औद्योगिक संबंध) आणि सह-अध्यक्ष सीएसबीएफ यांनी आभार मानले. यापूर्वी रैली मित्तल, अध्यक्षा, मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था यांच्यासमवेत मुंबई विभागातील डब्ल्यूडब्ल्यूओच्या अध्यक्षा रूपाली गोयल आणि सीआरडब्ल्यूडब्ल्यूओच्या अन्य पदाधिका-यांनी माटुंगा स्टेशनला भेट दिली आणि स्टेशनच्या ऑल वुमन टीमचा सत्कार केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित विविध उपक्रमांत वरिष्ठ अधिकारी यांच्यासह मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी पर्यवेक्षण केले. भारतीय रेल्वेची प्रथम महिला लोको पायलट आणि आशियातील प्रथम महिला ट्रेन चालक सुरेखा यादव यांच्या नेतृत्वात सर्व महिला दल, मंजुळा इनामदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 02534 मुंबई-लखनऊ विशेष ही ट्रेन चालविली. मुमताज काझी, प्रथम मोटरमन आणि श्वेता घोणे, उपनगरी गार्ड यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०८.४९ वाजता सुटणारी कल्याण लोकल तसेच हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.०६ वाजता पनवेलकरीता सुटणारी उपनगरी गाडी मनीषा म्हस्के, मोटरवुमन  यांनी चालविली. या व्यतिरिक्त पनवेल ते कल्याणकडे जाणारी मालगाडी तृष्णा जोशी, लोको पायलट, सुश्री सेल्वी नादर, सहाय्यक लोको पायलट आणि कु. सविता मेहता, गुड्स गार्ड यांनी चालविली.  पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर विभाग आणि मध्य रेल्वेच्या कार्यशाळांमध्ये कोविड प्रोटोकॉलच्या सर्व नियमांचे पालन करून असेच उपक्रम राबविण्यात आले. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.