रेमडेसिवीर इंजेक्शन्सची निर्यात थांबविण्याचा केंद्राचा निर्णय

Share This News

नवी दिल्लीः कोरोनाचे संकट अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचले असताना रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याचे मोठे संकट टाळण्यासाठी या इंजेक्शन्सची निर्यात थांबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. कोरोना रुग्णांसाठी लाभदायक ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढत असून त्या तुलनेत पुरवठा अत्यंत कमी आहे. इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे होणाऱ्या काळाबाजारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून लोकांमध्ये असंतोष वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने तातडीने इंजेक्शन्सची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत पुरवठा व्यवस्थित होत नाही, तोवर निर्यात बंद राहील, असे आदेश केंद्र सरकारने कंपन्यांना दिले आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.