भाजपच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांकडे तक्रारींची सेंच्युरी

Share This News

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाबाबत १०० विविध प्रकाराच्या तक्रारींचे पत्र बुधवार, २४ मार्चला भाजपकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावत यांनी राजभवात राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था बिकट होत चालली आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने एका पत्राच्या माध्यमातून केली. महाविकास आघाडी सरकारचे विविध घोटाळे, गैरप्रकार आदीं १०० मुद्द्यांवर पुराव्यानिशी तक्रार केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. पोलिस दलातील बदल्यांचे रॅकेट बाहेर आणल्यानंतरही सरकार कारवाई करीत नसल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.