चंदन गोस्वामी भाजपचे प्रदेश पॅनेलिस्ट

Share This News

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन नवीन पॅनेलीस्टची नेमणूक केली आहे. मुंबईच्या राणी द्विवेदी,पुण्याचे अली दारूवाला व नागपूरचे चंदन गोस्वामी यांना ही नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चंदन गोस्वामी हे १९९१ पासून २०१० पर्यंत भाजप व्यापारी व उद्योजक आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख होते.त्यानंतर भाजप मधील प्रसार माध्यम आघाडीत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या.  त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाला पाहता चंदन गोस्वामी यांचेकडे हि जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चंदन गोस्वामी यांनी त्यांच्या नियुक्तीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रदेश मीडिया प्रमुख विश्‍वास पाठक, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, विदर्भाचे संगठनमंत्री डॉ. उपेन्द्र कोठेकर, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार गिरीश व्यास, आमदार क्रिष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुं भारे, पूर्व आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहले, मिलिंद माने, कोषाध्यक्ष राजेश बागडी, माजी महापौर संदीप जोशी, श्रीकांत देशपांडे, संजय फांजे यांचे आभार मानले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.