चंद्रपूर : २४ तासात ६६८ पॉझिटिव्ह; नऊ मृत्यू; २१८ कोरोनामुक्त

Share This News

चंद्रपूर दि 9 : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला असून आजवरची २४ तासातील कोरोना मृत्युसंख्या व रुग्णसंख्या दिसून आली आहे. मागील २४ तासात २१८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर, ६६८ करोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून नऊ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३१ हजार १६८ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २६ हजार ९१८ झाली आहे. सध्या ३ हजार ७९४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ९१ हजार ८५३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ५६ हजार २०३ नमुने निगेटीव्ह आले आहेत.आज मृत झालेल्यामध्ये वणी येथील ३६ वर्षीय पुरुष, शेगाव वरोरा येथील ४० वर्षीय पुरुष, रामदेव बाबा मंदिर, वरोरा येथील ८० वर्षीय महिला, नागभीड येथील ६७ वर्षीय महिला, भेमदाडा, राजुरा येथील ५२ वर्ष महिला, रामपूर राजुरा येथील ५२ वर्षीय पुरुष, चिमूर येथील ५० वर्षे महिला, वरोरा शहरातील ६० वर्षीय पुरूष व ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ४५६ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ४१३ , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २०, यवतमाळ १९ , भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधीत आलेल्या ६६८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील १७५, चंद्रपूर तालुका ५० , बल्लारपूर ३६ , भद्रावती ३७, ब्रम्हपुरी २१ , नागभिड ३१, सिंदेवाही नऊ, मूल ३७ , सावली २३ , पोंभुर्णा एक, गोंडपिपरी दोन, राजूरा २५ , चिमूर ३९ , वरोरा १३३ , कोरपना ३७ , जीवती दोन व इतर ठिकाणच्या १० रुग्णांचा समावेश आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.