चंद्रपूर बँक घोटाळा, निखिल घाटे अटकेत | Chandrapur bank scam, Nikhil Ghate arrested

Share This News

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधीचा अपहर करून पसार झालेला रोखपाल निखिल घाटेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.
विदर्भात सर्वाधिक उलाढालींमध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. बँकेत रोखपालपदावर असलेल्या निखिल घाटे याने ग्राहकांची फसवणूक केल्याचे समोर आले. ग्राहकांनी दिलेले पैसे खात्यात न टाकता त्याने स्वतःच्या वापरात आणले. जिल्हा बँक शाखेत अपहाराचा हा प्रकार गेल्या पाच महिन्यांपासून सुरू होता. बँकेने ऑडिट करून गैरव्यवहार ३ कोटी ५४ लाखांचा असल्याचा अहवाल दिला आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी घाटे हा वर्ध्याहून नागपूरला खासगी वाहनाने नातेवाइकाला भेटायला येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह बुटीबोरी-नागपूर रोडवर पाळत ठेवली. खापरी नाक्यावर खासगी वाहनाने येताना त्याला ताब्यात घेण्यात आले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.