चंद्रपूर : २४ तासात १०३ नव्याने बाधित

Share This News

चंद्रपूर 12 नोव्हेंबर : जिल्ह्यात मागील २४ तासात कोरोनामुळे एका बाधिताचा मृत्यू झाला असून १०३ नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या १७ हजार ३७८ वर पोहोचली आहे, तर १६८ बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १४ हजार ६७५ झाली आहे. सध्या २ हजार ४४३ बाधितांवर उपचार सुरू आहे.जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २८ हजार ८३१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख ९ हजार ९९३ नमुने निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात एका बधिताचा मृत्यू झाला आहे. परिणामी आतापर्यंत २६० बाधिताचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २४३ , तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली आठ, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.