चंद्रपूर : जिल्हाधिकार्‍यांनी केली धान खरेदीची पाहणी

Share This News

चंद्रपूर
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ब्रम्हपुरी व चौगान येथील बाजार समितीला नुकतेच आकस्मिक भेट देवून धान खरेदी नियमानुसार सुरू आहे का, याची पाहणी केली.
यावेळी त्यांनी धानाची ग्रेडीग व्यवस्थतीत करून शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे तसेच परराज्यातील व व्यापार्‍यांकडील धान स्थानिक बाजार समितीत खरेदी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी बाजार समितीत धानविक्रीसाठी जमलेल्या शेतकर्‍यांशी मुक्तसंवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नायब तहसीलदार योगेश शिंदे, मंडळ अधिकारी बोदे, संबंधीत सहाय्यक निबंधक, तलाठी, बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील धान उत्पादक शेतकर्‍यांना हमीभावावर रुपये ७00 बोनस जाहिर केला आहे.
त्यामुळे परराज्यातील धान महाराष्ट्रात विक्री करून शासनाची फसवणूक करणार्‍यांवर पालकमंत्री यांनी मागील महिण्यात तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील नुकतेच संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश दिले होते.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.