चंद्रपूर भीषण आगीत इलेक्ट्रिकल दुकान खाक

Share This News

शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या प्रमोद चतारे यांच्या इलेक्ट्रिकल दुकानाला आग लागल्याने १५ ते २0 लाखांपयर्ंतचे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी रात्री १२ वाजताच्च्या दरम्यान अचानक शार्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती होताच नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या आठ ते दहा गाड्या विझविण्याकरिता लागल्या. आग लागली असल्याचे कळताच श्रीसाई मित्र परिवाराचे सदस्य रोहित आडगुरवार, देवा गुरनुले यांनी धाडस दाखवित आग विझविण्याकरिता सहकार्य केले.आग एवढी भयानक होती की रात्री १२ वाजता लागलेली आग सकाळपयर्ंत सुरूच होती. दुकानातले वायर, फॅन, मोटार, कुलर, हिटर, सब मरर्शिबल पंप आदी इलेक्ट्रिकलच्या संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या. त्यामुळे प्रमोद चतारे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती होताच मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, नगरसेवक प्रशांत सर्मथ, प्रभाकर भोयर, चंदू चतारे, विवेक मुत्यलवार, किशोर कापगते, बंडू साखलवार आदी युवकांनी भेट देऊन आग विझविण्याकरिता सहकार्य केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.