चंद्रपूर : प्रशिक्षणातून कौशल्य विकसित करून रोजगार प्राप्त करा – जिल्हाधिकारी

Share This News

 चंद्रपूर 3 फेब्रुवारी: कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरवात सन 2015 पासून करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी परिपूर्ण प्रशिक्षणातून आपले कौशल्य विकसित करून घ्यावे व त्यातून रोजगार किंवा स्वंयरोजगार प्राप्त करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाची अंमलबलावणी करणे करीता प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरु करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, यांचे हस्ते क्वेस कॉप लि. पिएमकेके, चंद्रपूर या संस्थेमध्ये नुकतेच प्रशिक्षण बॅचचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता र्मागदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्यासाहेब येरमे यांनी उमेदवारांना चालुन आलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या संधीचा लाभ घ्यावा व जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी संस्थेचे संचालक अनुराग सिंग यांनी संस्थेतर्फे प्रशिक्षणार्थ्यांना सिसिटीव्ही इन्टॉलेशन, कम्प्युटिंग ॲण्ड पेरीफेरल टेक्नीशीअन या जॉब रोलमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली. या मध्ये विविध कंपनीशी टाय अप असून उमेदवारांना रोजगार/ स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. उपस्थित 85 प्रशिक्षणार्थ्यां जिल्हाधिकारी गुल्हाने व सहायक आयुक्त भैय्यासाहेब येरमे यांचे हस्ते प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची किट वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.