चंद्रपूर उन्हाचे तीव्र चटके ४३.६ अंश सेल्सियसवर

Share This News

चंद्रपूर 30 मार्च : सर्वाधिक उष्णतामानासाठी प्रख्यात असणाऱ्या चंद्रपूरमध्ये या मोसमात सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सियसची नोंद मंगळवारी करण्यात आली आहे. परिणामी उन्हाचे चटके खऱ्या अर्थाने आता तीव्र होण्यास सुरुवात झाली असून ब्रम्ह्पुरीत ४३ तर, नागपुरात ४१.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूर शहराचा पारा आता वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान चाळीसच्या आसपास होते. पण आता शहरातले वातावरण तापत आहे. यामुळे नागरिकांना फटका बसला असून, याचा परिणाम दैंनदिन जीवनावर पडला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उकाड्याची झळ बसत आहे. उष्णतेचा पारा आणखी वाढण्याचे संकेत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.