चंद्रपूर जगातील चौथे उष्ण शहर

Share This News

नागपूर ः विदर्भात कडक उन्हाळ्याच्या झळा आताच जाणवत असताना बुधवारी चंंद्रपूर शहराची जगातील चवथ्या क्रमांकाचे उष्ण शहर म्हणून नोंद झाल्याचे वृत्त एका हवामानविषयक आंततराष्ट्रीय संकेतस्थळाने दिले आहे.
बुधवारी चंद्रपूरमध्ये ४३.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यानुसार चंद्रपूर हे जगातील चवथ्या क्रमांकाचे उष्ण शहर होते, असा दावा या संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. नागपुरातील क्षेत्रीय हवामान कार्यालयाकडील नोंदीनुसार, चंद्रपूर हे बुधवारी विदर्भातील सर्वात उष्ण शहर होते. त्या खालोखाल अकोला शहराचे तापमान होते. उपराजधानी नागपुरातही पारा गेल्या आठवड्यातच चाळीस अंश सेल्सियसच्या वर पोहोचला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.