चंद्रपूर : आता ताडोबात गाईडचे ग्रेडेशनची प्रक्रिया

Share This News

चंद्रपूर : राज्यात व्याघ्र पर्यटनासाठी प्रख्यात असणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर मध्ये गाईडचे ग्रेडेशनची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्या अंतर्गत देशातील हा पहिलाच प्रयोग असून बुधवारपासून याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे. शक्ती आणि सौंदर्याचे प्रतीक असलेल्या वाघांच्या मुक्त संचारामुळे ताडोबाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. या प्रकल्पात वाघांशिवाय बिबट , गवा, सांबर, चितळ, रानडुक्कर हे प्राणी प्रामुख्याने आढळतात. महाराष्ट्राचे रत्न म्हणून ओळख असणाऱ्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वेगळेपण हा एक मौलिक ठेवा आहे. परिणामी या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. या प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची गाठ ही ‘गाईड’शीच पडते, परिणामी गाईड हा वाघ प्रकल्पाचा चेहराच असतो. ताडोबाला येणारे पर्यटक बहुतेकदा एक चांगला अनुभव घेऊन जातात. यात येथील अप्रतिम वन्यजीवसृष्टीचे दर्शन हे एक महत्त्वाचे कारण असले, तरी ते आपल्या जंगल आणि पारंपारिक गोष्टींच्या ज्ञानाने पर्यटकांचा अनुभव अविस्मरणीय बनवणाऱ्या स्थानिक गाईडसची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते. अनेक स्थानिक गाईड्स हे पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय बनले असून त्यांना पर्यटकांकडून भरपूर प्रेम आदर आणि बक्षीसही मिळत आहेत. वनविभाग देखील गाईडच्या कामाचे कौतुक करत असून त्यांच्या क्षमतावाढीसाठी प्रशिक्षण आणि आर्थिक लाभाची तरतूद करत आहेत. या प्रकल्पात बफर मध्ये सुमारे २५० ‘गाईड’ असून ते ‘गाईड’ पर्यटकांशी कसे वागतात, ताडोबाबाबतची त्यांची माहिती, वन्यजीव – झाडे, इतिहास हे त्यांच्याकडून जाणून त्यांना अवगत असणारी भाषा यावरून त्यांची लेखी व तोंडी चाचणी घेतली जाणार आहे. त्यातील लेखी चाचणी बुधवारी घेतली गेली आहे. जे या प्रक्रियेतून जाणार नाहीत त्यांचा समावेश ‘नॉन-स्टार’ गाईड म्हणून राहणार आहेत. ग्रेडेशनच्या माध्यमातून गाईडची क्षमता सातत्याने सुधारत राहणे अत्यावश्यक असल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.