चंद्रपूर : अवैध गौण खनिज उत्खननातील पोकलँड मशीन जप्त

Share This News

चंद्रपूर 5 फेब्रुवारी – जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या जिल्हा भरारी पथकाने अवैध गौण खनिज उत्खननातील पोकलँड मशीन जप्त केली आहे. जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या जिल्हा भरारी पथकाने जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता 2 फेब्रुवारी 2021 रोजी भद्रावती तालुक्यातील मांनोर येथे भेट देवून पाहणी केली. यावेळी कर्नाटक इम्टा कोलमाईन्स लिमीटेड, यांचे क्षेत्रात मुरूम या गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या पोकलँड मशीन टाटा हिटाची एक्स 200 आयएलसी व हायवा क्र. 34 अेबी 6776 वाहन जप्त करण्यात आले. उक्त वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता -1966 च्या कलमातील विविध तरतुदीअन्वये पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी सांगितले. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.