चंद्रपूर : घरकुलासाठी लागणारी रेती उपलब्ध करून द्या

Share This News

जिलतील ग्रामीण विभागात प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना आणि यशवंतराव चव्हाण घरकुल योजनाअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. या घरकुलाकरिता शासनाकडून फक्त १.३0 लाख रुपये प्राप्त होतात. त्यात सर्व बांधकाम सामग्री महाग झाली आहे. परंतु शासनाने अजून घरकुल योजनेचे अनुदान वाढवलेले नाहीत. याशिवाय बांधकामाला लागणार्‍या रेतीच्या घाटाचा लिलाव न झाल्यामुळे अवैध रेती घेण्याकरिता जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. म्हणून विविध योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल बांधकामाकरिता लागणारी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहेत.
घरकुल बांधकामाकरिता लाभार्थ्यांना करून द्यावी याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, चंद्रपूर विधानसभा प्रमुख दीपक खारकर, संभाजी ब्रिगेड शेणगावचे अध्यक्ष मंगेश चटकी, कोषाध्यक्ष राकेश भगत यांनी सादर केले.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.