चंद्रपूर : लालपेठ व घुग्घुस येथील राजीव रतन हॉस्पीटल कोव्हीड रूग्णांसाठी अधिग्रहीत – आ. सुधीर मुनगंटीवार

Share This News

चंद्रपूर 11 एप्रिल – जिल्हयात करोना रूग्णांची झपाटयाने वाढणारी संख्या तसेच वाढणारा मृत्यु्दर लक्षात घेता वेस्टर्न कोलफिल्डस़ लिमीटेडचे चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरातील हॉस्पीटल व घुग्घुूस येथील राजीव रतन हॉस्पीटल जिल्हा प्रशासनाने कोव्हीड रूग्णांसाठी अधिग्रहीत करावे तसेच १०० बेडेड महिला रूग्णालय सुध्दा तातडीने कोव्हीड रूग्णांसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाीधिकारी अजय गुल्हाने आणि वेकोलिचे सिएमडी मनोजकुमार यांच्याशी आ. मुनगंटीवार यांची चर्चा झाली असुन त्यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.