पोलिस निरीक्षकावर खंडणीचा गुन्हा करा; न्यायदंडाधिकाऱ्यांचे आदेश Charge a ransom on a police inspector; Magistrate’s order

Share This News

नागपूर : पोलिस निरीक्षक विनोद चौधरी आणि त्यांच्या एका साथिदारावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेत.
राजा शरिफ असे या प्रकरणातील फिर्यादीचे नाव आहे. त्याचे वकील आशिष कटारिया यांच्यामार्फत त्याने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जानुसार, २०१९मध्ये शरिफने या प्रकरणातील अन्य आरोपी अशफाक अली याला काही कामासाठी १४ लाख रुपये उधार दिले. त्याचे पुरावेसुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा त्याने आपल्यात अर्जात केला आहे. हे परत करण्यास अली टाळाटाळ करीत होता. शरिफने त्याला पैशांसाठी अनेकदा फोन केले. मात्र त्याने पैसे परत केले नाहीत.
अलीने चौधरींना संपर्क साधला. चौधरी हे तेव्हा गुन्हे शाखेच्या युनीट ३ चे पोलिस निरीक्षक होते. चौधरींनी शरिफला फोन करून त्याला बोलावून घेतले. शरिफ पोहचला तेव्हा अली तेथे चौधरींसह उपस्थित होते. या दोघांनी आपल्याला मारहाण केली व आपल्याकडी सोन्याचे ब्रेसलेटसुद्धा हिसकावल्याचा आरोप शरिफने केला आहे. तसेच अलीकडून पैसे न घेण्याची धमकीही दिली. पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याने शरिफने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. न्यायदंडाधिकारी व्ही. एम. देशमुख यांनी याप्रकरणी चौधरी व अलीवर मारहाण, धमकी देणे व खंडणीच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्याचे आदेश लकडगंज पोलिसांना दिलेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.