गँगस्टर आंबेकरविरुद्ध दोषारोपत्र दाखल |Chargesheet filed against gangster Ambekar

Share This News

नागपूर : व्यापाऱ्याची शेती बळकावून त्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणात अटकेतील गँगस्टर संतोष शशिकांत आंबेकर (वय ५०, संती रोड, इतवारी) व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हेशाखेने सोमवारी १८६३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. संतोष याचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३४, मोझरकर वाडा, इतवारी), प्रवीण अशोक महाजन (वय ४७, श्रीकृपा अपार्टमेंट, मनीषनगर) आणि नितेश पुरुषोत्तम माने (वय ४२, आनंदनगर, जबलपूर,मध्य प्रदेश),अशी अन्य आरोपींची नावे आहेत.
विकास रामविलास जैन (वय ४१ रा.वर्धमाननगर) हे धान्य व्यापारी आहेत.त्यांची कामठी तालुक्यातील वडोदा येथे शेती आहे. आंबेकर ,त्याचा भाचा व अन्य साथीदारांनी बनावट दस्तऐवज तयार करून ही शेती बळावली व त्याची माने याला विक्री केली. दरम्यान जैन यांना या ठिकाणी गोदाम बांधायचे होते. त्यांनी तलाठ्याकडून सातबारा घेतला. यावेळी ही शेती आंबेकर याने बनावट दस्तऐवजाद्वारे स्वत:च्या नावे केली व नंतर ती विकल्याचे जैन यांना समजले. जैन यांनी गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे तक्रार केली. राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांनी आंबेकर व त्याच्या साथीदाराविरुद्ध २२ नोव्हेंबर २०१९ ला नवीन कामठी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. आंबेकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी यांनी २३ सप्टेंबर २०२० ला आंबेकर व त्याच्या टोळीविरूद्ध मकोकाअंतर्गत गुन्ह्यात वाढ केली. याप्रकरणाचा तपास नंदनवार यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासानंतर नंदनवार यांनी सोमवारी न्यायालयात आंबेकर व त्याच्या टोळीविरूद्ध १८६३ पानांचे दोषारोपपत्र सादर केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.