नागपुरातील युको बँकेतील घोटाळ्यात आरोपपत्र दाखल | Chargesheet filed in UCO Bank scam in Nagpur

Share This News

नागपूर : न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतलेल्या शेतकरी कर्ज वाटप योजनेतील २५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत सीबीआयने तपासानंतर आरोपपत्रही दाखल केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयने खंडपीठापुढे शपथपत्राद्वारे ही माहिती दिली.
घोटाळ्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांवर खटला दाखल करण्यासाठी बँकेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली आहे. बँकेने काही निवडक अधिकाऱ्यांविरुद्धच खटला चालविण्याची परवानगी दिली आहे. अनेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे न्यायालयाने सीबीआयला विचारणा केली आहे की, त्यांना बँकेचा हा निर्णय मंजूर आहे का? की त्यांना याला आव्हान द्यायचे आहे? यावर सीबीआयने दोन आठवड्यात सविस्तर उत्तर द्यावे, असे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. हा घोटाळा लपवून त्याची पोलिसांनी माहिती न देण्याचा आरोप काही अधिकाऱ्यांवर आहे. यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याप्रकरणात आरबीआयला ठोस भूमिका ठरविण्याचे आदेश दिले होते. अॅड. रजनीश व्यास यांनी न्यायालय मित्राची भूमिका बजावली तर अॅड. मुग्धा चांदुरकर यांनी सीबीआयची बाजू मांडली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.