गोव्यात कॅसिनो फ्रेंचायसीचे आमीष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक
नागपूर : गोव्यात कॅसिनो व आयटीसी सिगारेट कंपनीची फ्रेंचायसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंडांच्या टोळीने विद्यार्थ्यांची ३८ लाख रुपयांनी फसवणूक केली. पैसे परत मागितल्यावर विद्यार्थ्यांना धमकाविण्यात आले. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. आरोपींमध्ये सुहास ठाकूर, मुन्ना यादव, प्रज्वल ढोरे, वात्या, धीरज रूपचंदानी व श्रीओम गौतम यांचा समावेश आहे. चंद्रपूर येथील २१ वर्षीय हितेश भरडकर अंबाझरीच्या हिलटॉप येथे किरायाने राहतो. तो कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याची ऑगस्ट २०१९ मध्ये सुहास ठाकूर याच्याशी ओळख झाली. ठाकूर कुख्यात गुन्हेगार आहे. सुहास ठाकूर याने हितेश व त्याच्या मित्रांना आमिष दाखविले. ठाकूर याने आपले गोव्यात कॅसिनो, वीट भट्टा व आयटीसी सिगारेट कंपनीची एजन्सी असल्याचे सांगितले.