चक्क सर्वोच्च न्यायालयाचंही ‘वर्क फ्रॉम होम

Share This News

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना आणि कामकाजालाही करोना संक्रमणाचा फटका बसलाय. सर्वोच्च न्यायालयाचे ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी आतापर्यंत करोना संक्रमित आढळले आहेत. देशातील गंभीर परिस्थिती ध्यानात घेता सरन्यायाधीशांसहीत सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या घरातूनच प्रकरणांवर सुनावणी करणार आहेत. सोबतच, संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाचा परिसर सॅनिटाईझ करण्याचं काम सुरू आहे.


राजधानी दिल्लीत रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या समोर आल्यानंतर कोर्टरुमसहीत संपूर्ण कोर्ट परिसर सॅनिटाईज करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. त्यामुळे, आजपासून (सोमवार) सर्व बेंच निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिरानं कामकाज सुरू करतील.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.