“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली” “Chief Minister Uddhav Thackeray is Sachin Waze’s godfather; They did all the work for them. “

Share This News

मुंबई – “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत”. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य भाजपचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. तसंच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याआधी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही नारायण राणे यांनी यावेळी केली आहे.उद्धव ठाकरेंना वर्षभर चांगलं काम करता आलं नाही. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणं वाझेंकडे देण्यात आली होती. संबंध नसतानाही वाझेंकडे ही प्रकरणं का देण्यात आली, असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझेंकडून सर्व कामे करुन घेतली, असा दावा देखील नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे संसद भवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.

सचिन वाझे आधी सस्पेंड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना डिपार्टमेंटमध्ये घेतलं. तसेच त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आले. यावरून, “मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचं दिसून येतं”, असं नारायण राणे म्हणाले.दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याचं सांंगितलं जात आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.