मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार चालविण्याचा नैतिक अधिकार गमावला

Share This News

केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका

नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार चालविण्याचा नैतिक अधिकार गमावला आहेत. गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात नैतिकता आहे की नाही, अशी टीका केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
जे काही झाले याची जबाबदारी मुख्यमंत्री ठाकरे घेणार की नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या पोलीस आयुक्ताने थेट गृहमंत्र्यावर खंडणीखोरीचे आरोप लावले आहेत. या प्रकरणात सकृत्दर्शनी काही तथ्य दिसत असल्यानेच मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.