चिमुकल्याचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू

Share This News

नागपूर – खेळताना पाळण्याच्या दोरीमुळे गळफास लागून एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या मासोद गावात घडली आहे. अकरा वर्षीय पियुष धारापुरे असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मृतक पियुषची आई माहेरी गेली होती तर वडील दुखापतग्रस्त असल्याने ते विश्रांती घेत असल्याची माहिती पुढे आली आहे

दुपारच्या वेळेत पियुष हा पाळण्यात खेळत होता, त्याच वेळी त्याला खेळला खेळता गळफास लागला. त्या खोलीत कुणीही नसल्याने पियुष कुणालाही मदतीसाठी बोलावू शकला नाही,ज्यात त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. पियुष चा आवाज येत नसल्याने पियुषच्या वडिलांनी आतील खोलीत जाऊन बघितले तेव्हा पियुष दोरीला अडकलेला होता. त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा
डॉक्टरांनी पियुषला मृत घोषित केले. घटनेची माहिती समजताच कोंढाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पियुषच्या मृत्यूला त्याचे वडील जबाबदार- मामाचा आरोप

पियुषचा गळफास लागून मृत्यू झल्याची माहिती समाजात त्याची आई आणि मामा हे मासोद गावात दाखल झाले होते. त्यावेळी पियुषच्या मृत्यू करिता त्याचे वडील जबाबदार असल्याचा आरोप मामा यांनी केला आहे,या संदर्भात त्यांनी कोंढाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे

11 वर्षिय मुलांचा पाळण्याच्या दोरी ने गळफांस लागून मृत्यु झाला …पियुष पुष्पराज धारपुरे 11 वर्ष असे मृतक मुलाचे नाव आहे. पियुष चे वडिल पुष्पराज धारपुरे हे कोंढाळी पासुन 9 कि.मी अंतरावरील मासोद येथील रहवासी आहे.एक महिण्यापुर्वी दुचाकी अपघातात पुष्पराज धारपुरे गंभिर जखमी झाले म्हणुन ते बेडरेस्ट वर आहे.पियुष ची आई आपल्या माहेरी गेली होती पियुष दुपारी 4 वाजता घरातील दोरीच्या पाळण्यावर खेळत असतांना पाळण्याच्या दोरीने अचानक गळफास लागुन पियुष चा मृत्यु


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.