चंद्रपूर : चिमूर क्रांतिभूमीत होणार आता २४ तास पाणीपुरवठा

Share This News

चिमूर क्रांतिनगरीत नगर परिषदेची निर्मिती करीत असताना आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी चिमूर न.प.अंतर्गत बिकट पाणी समस्या दूर करण्यासाठी चिमूरकरांना ५८ कोटींची २४ तास पाणी पुरवठा योजना न.प.च्या माध्यमातून देण्याचा शब्द दिला होता. दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांनी सदर काम सुरू करण्याचे निर्देश दिले असून नगर विकास विभागाचे सहसचिव यांनी संबंधित यंत्रणेला काम सुरू करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे आता लवकरच २४ तास पाणी पुरवठा होणार असल्याने आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
चिमूर नगर परिषदेमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाभियान मधून ५१.५0 कोटी च्या योजनेस तत्कालीन शासनाने मंजुरी दिली होती. दरम्यान, चिमूर पाणी पुरवठा २४/७ योजनेची निविदा व कंत्राटदार सुध्दा निश्‍चित करण्यात आले होते, परंतु नगर परिषदमधील विरोधकांनी न्यायालयात धाव घेऊन पाणी पुरवठा योजनेस स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले असता आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी प्रकिया पूर्ण करीत संघर्ष करून शासन दरबारी सतत पत्रव्यवहार केले.
शासनाने सुद्धा मंजूर कामे स्थगित केली त्यामुळे पाणी पुरवठा योजना सुरू करण्यास विलंब होत होता तरीही अर्थमंत्री अजित पवार यांना पत्रव्दारे पाठपुरावा केला. त्यांनी पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्याचे आदेश दिल्याने अखेर नगर विकास विभाग सहसचिव पां. जो. जाधव यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर व मुख्याधिकारी न. प. चिमूर यांना कार्यादेश तत्काळ देऊन प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहे.
चिमूर शहरात विशेष म्हणजे पेठ मोहला परिसरात कित्येक वर्षांपासून नळाद्वारे पाणी मिळत नसल्याने त्या परिसरातील नागरिक दुचाकीवरून पाणी आणत होते.
तसेच इतर प्रभागात अनियमित नळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त होते. आमदार भांगडिया यांनी चिमूर शहरात २४ तास पाणी पुरवठा योजनेच्या कामास तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.