नागपूरातील ब्राऊन शुगर तस्कर महिला चित्रा ठाकूरला अटक Chitra Thakur, a brown sugar smuggler from Nagpur, was arrested

Share This News

चंद्रपुर:-– चंद्रपुर जिल्ह्यात दारू बंदी झाल्या पासून दारू तस्करांना सोबतच मादक पदार्था तस्करांनी सुद्धा  आपला मोर्चा चंद्रपुरकडे वळवला .चंद्रपुर  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मादक पदार्थाच्या तस्करी  होत असल्याचे  निर्देशनातं येत  असतानाच 8 मार्चला शहरातील वरोरा नाका चौकात लालपेठ निवासी अजय रविदास नामक युवकांकडून 25 ग्राम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले होते.
दारूबंदी नंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या मादक पदार्थाच्या तस्करीबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत नागपूरातील ब्राऊन शुगर तस्कर महिला चित्रा ठाकूर यांना अटक केली.आरोपी ठाकूर यांना न्यायालयात हजर केल्या गेले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.