१ एप्रिलपासून ४५ वर्षांच्या वरील नागरिकांना लस घेता येणार

Share This News

कोरोनाच्या वाढत्या संकटावर केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

नवी दिल्लीः देशात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने लसीकरणाची व्यापी आणि वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांच्या वरील सर्व नागरिकांना लसीकरण करून घेणे शक्य होणार आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती देताना सांगितले की, १ एप्रिलपासून ४५ वर्षांच्या वरच्या सर्वच नागरिकांना लस घेता येणार आहे. त्यासाठी पात्र नागरिकांकडून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्यांच्या लसीकरणानंतर सध्या साठ वर्षांच्या वरच्या नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत एकूण ४ कोटी ८५ लाख नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले असून त्यात ८५ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचे दोन डोस उपलब्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रासह किमान दहा राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यावर खबरदारी हाच उपाय असल्याचे सांगताना लॉकडाऊन संदर्भातील निर्णय त्या त्या राज्यांनाच घ्यावा लागणार असल्याचे जावडेकर म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.