अनिल देशमुखांच्या प्रगती पुस्तकावर मुख्यमंत्री शेरा देतील : संजय राऊत

Share This News

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. एका एपीआयमुळे महाराष्ट्राचं सरकार (Maharashtra Government) अस्थिर होणार नाही. चंद्रशेखर आझादांचं दिल्लीतील सरकार दोन हवालदारांमुळे कोसळलं होतं, मात्र महाराष्ट्रात तसं काही होणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. ते दिल्लीत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “एका एपीआयवरुन (Sachin Vaze) काय घडामोडी घडणार? काल याबाबत शरद पवारांनीही सांगितलंय. महाराष्ट्राचं सरकार स्थिर आहे. चंद्रशेखर आझादांचं सरकार दोन हवालदारांनी पाडलं होतं. दिल्लीत दारात उभे राहिलेल्या हवालदारांमुळे सरकार कोसळलं होतं. तसं महाराष्ट्रात सरकार अस्थिर झालंय या भ्रमातून बाहेर पडायला हवं”

मनसुख हिरेन आणि अंबानींच्या घराबाहेरील तपासाबाबत NIA, ATS तपास करत आहेत. केंद्रीय यंत्रणा तपास करत असताना हस्तक्षेप करण्यात अर्थ नाही. मात्र आमचं तपासावर लक्ष आहे, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.

वाझे शिवसेनेशी संबंधित, त्यात चूक काय

एखादी व्यक्ती पूर्वी शिवसेना किंवा राजकीय पक्षासी संबंधित असेल तर चुकीचं आहे का? शिवसेना ही बंदी घातलेली संघटना नाही. प्रत्येक मराठी माणूस शिवसेनेशी संबंधित आहे. खातेबदल हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित, कुणाला काय द्यायचं हे ते ठरवतात, पण हे तीन पक्षाचं सरकार आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

शार्जील इमाम नावाचे सदगृहस्थ उत्तर प्रदेश सरकारचे. त्यांच्याच राज्यात आराम करत आहेत, योगी सरकारने पकडून महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात द्यावं, असं राऊत म्हणाले. शार्जील इमामवर कोणती कलमं लावावी याचं मार्गदर्शन फडणवीसांनी करावं, विरोधकांनी वकील असावं, त्यांचा वकिली बाणा पाहायला मिळाला.

पैलवान चितपट झाला बोट वरती आहे, पण मी हरलो नाही असं देवेंद्र फडणवीस कोणत्या पैलवानाबद्दल म्हणाले, हे त्यांनी सांगावं.

ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही, तिथे घाईघाईने अशा कारवाया करणं हा तपास यंत्रणांना छंद जडला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

अनिल देशमुखांना कोणता शेरा? 

गृहमंत्री अनिल देशमुख यांची कामगिरी चांगली आहे, असं सर्टिफिकेट शिवसेना देतेय का? असा सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे प्रमुख असतात. कोणत्या मंत्र्यांच्या प्रगती पुस्तकात कोणता शेरा लिहायचा, हे मुख्यमंत्री ठरवतील, अर्थात हा अधिकार शरद पवारांनाही आहे, असं संजय राऊत म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.