जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणाले, माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका ! When the Chief Minister said to Fadnavis, do not separate me from me!

Share This News

मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडाळाची स्थानपा करा, अशी जोरदार मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं होतं. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भाजप नेत्यांना या मुद्द्यावरुन फटकारलं आहे.

विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी विकास महामंडळाची स्थापना तातडीने करा, अशी मागणी करताना भाजपनं मुख्यमंत्र्यांनी विदर्भ हे त्यांचं आजोळ असल्याची आठवण करुन दिली होती. त्यावर आता भाजपला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका, असा दमच भरला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

“अरे हा, ते एक राहिलं विदर्भाचं, माझं आजोळ. मी नाही विसरलो. पण माझं आजोळ माझ्यापासून तोडण्याचा विचार तुमच्या मनामध्ये आहे तो पहिला सोडून द्या. विदर्भ वेगळा होणार नाही. मी तो होऊ देणार नाही. विदर्भाला आम्ही सोबत ठेवून महाराष्ट्राचा एकत्रित विकास केल्याशिवाय राहणार नाही. फक्त विदर्भाचा कणव आणायचा, माझ्या आजोळाची आठवण मला करुन द्यायची. माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका”, अशा शब्दात भाजपला एकप्रकारे इशारच दिलाय.

विदर्भ, मराठवाडा विकास महामंडळावरुन अजितदादा-फडणवीस आमनेसामने

विदर्भ आणि मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. दादांच्या पोटातले ओठावर आले. हा विदर्भ-मराठावाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली होती.

सोमवारी नेमकं काय घडलं?

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यावर अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी वैदानिक विकास महामंडळ घोषित करू, असं पवार यांनी स्पष्ट केलं.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.