अखेर शेतकरीवर्गाला मिळणार नुकसान भरपाई
नागपूर :जुलै,ऑगस्ट 2019 मध्ये उमरेड विधानसभेत झालेल्या अतिवृष्टीमुळे भिवापूर तालुक्यात 27 कोटी,उमरेड 4 कोटी,कुही 10 कोटी अशी नुकसान भरपाईची मागणी भाजपा नेत्यांनी लावून धरली होती.
त्याकरिता देवेंद्र फडणवीस, आमदार राजू पारवे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी य इतर सर्वांना वारंवार माहिती दिली. सतत पाठपुरावा केल्याने त्यात यश आले असून भिवापूर तालुक्यात 13 कोटी चे वितरण करण्यात आले आहे.
जी आर प्रमाणे 2019 मधील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याचे 50000रु चे कर्ज माफ होणार असून, ती यादी लवकर पाठवावी याकरिता संबंधित अधिकारी यांच्यासोबत बोलणे केले आहे. त्याकरिता आमदार राजू पारवे यांनी लक्ष घालावे,आणि उर्वरित पैसे लवकर पाठवावे अशी विनंती सुद्धा केली असल्याची माहिती आनंद राऊत यांनी दिली आहे.