फी मागणाऱ्या शाळांची तक्रार करा, कारवाई करू : शिक्षणमंत्री | Complain of schools demanding fees, we will take action: Education Minister

Share This News

मुंबई : कोरोना काळात शाळा बंद असताना चुकीच्या पद्धतीने फी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या व फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढणे, सत्र परीक्षेची गुणपत्रिका न देणे, उशिरा फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्या शाळांसंदर्भात तक्रारी आहेत त्या शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिलेत.


मंत्रालयात शालेय शुल्क वाढीसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी प्रा. गायकवाड यांनी हे आदेश दिलेत. बैठकीला अपर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, सचिव, विधी व न्याय विभाग, सहसचिव, विधी (शालेय शिक्षण) व पॅरेंट्स असोसिएशनचे पदाधिकारी जयंत जैन, प्रसाद तुळसकर, सुनिल चौधरी, जयश्री देशपांडे, सुषमा गोराणे, नाविद बेताब व अॅड अरविंद तिवारी आदी उपस्थित होते. राज्यस्तरीय व विभागीय शुल्क नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. या समित्यांकडे फी वाढीबाबतच्या पालकांच्या तक्रारी पाठविण्यात याव्या असे प्रा. गायकवाड यांनी सांगितले. अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या शाळांवर आरटीईनुसार कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.