तालुकास्तरीय पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण शिबिराचे समारोप |Conclusion of Taluka Level Animal Husbandry Training Camp

Share This News

हिंगणा : पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती हिंगणा याचे तर्फे तालुकास्तरीय पशुसंवर्धन विषयक तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. शिबिराच्या समारोप कार्यक्रम बचत भवन हिंगणा येथे आयोजित करण्यात आला. यावेळी शिबिरात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. पशुसंवर्धणासाठी आणि पशु व्यवसायासाठी हिंगणा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनींनी   शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले उत्पन्न वाढवावे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण तालुक्यातील शेतकऱ्यांना पाहिजे ती मदत वेळोवेळी करण्यास तयार आहे. आज शेतीला जोड व्यवसायाशिवाय पर्याय नाही.  त्यामुळे शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात पशुधन व्यवसाय करावा असे यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग म्हणाले.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग,पंचायत समिती सभापती बबनराव अव्हाळे, खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे, सुशील दीक्षित, पशुधन विकास अधिकारी ऋचा लांजेवार, पशुधन पर्यवेक्षक अमित तलमले, गणेश वाघे आदी सह पशुसंवर्धन विकास विभागाचे कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.