इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

Share This News

नागपुरात अनेक ठिकाणी निदर्शने

नागपूर : इंधन आणि गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये झालेल्या वाढीनंतर नागपुरात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
इंधन दरांचा भडका उडाल्यानंतर बुधवारी नगापुरातील काँग्रेस कार्यक्रर्ते अनेक भागात रस्त्यांवर उतरले. त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीबद्दल संताप व्यक्त केला. विविध पेट्रोल पंप गाठत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाहनचालकांना गुलाबपुष्प दिले व यासाठीच भाजपला निवडून दिले होते काय, अशी विचारणा केली. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली केंद्रातील एनडीए सरकार विशेषत: भाजप नागरिकांवर महागाई कशी लादत आहे, याबद्दल पेट्रोल पंपावर जाणे-येणे करणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला सांगण्यात आले. केंद्र सरकार अनेक सरकारी विभागांचे खासगीकरण करीत आहे. अनेक विभागांची विक्री करीत आहे, त्यामुळे तुमच्या मुलांना भविष्यात सरकारी नोकरी मिळणार नाही, असेही ध्वनीक्षेपकावरून काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत होते. करोना संसर्गामुळे देशात लॉकडाउन करावे लागले. त्यामुळे बहुतांश नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लॉकडाउनमुळे अनेकांच्या रोजगार, नोकऱ्यांवर गदा आली आहे. अशात तरुणाई मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होत असताना केंद्र सरकार इंधनाचे दर वाढवून महागाईला प्रोत्साहन कसे देऊ शकते, असा सवालही काँग्रेसने केला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.