शिवसेना जिल्हाध्यक्षाच्या गावात काँग्रेसचा झेंडा,देवरी तालुक्यातील निवडलेले सरपंच
चंद्रपूर,दि.13ः- राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. वरोरा भद्रावती विधानसभेत देखील अनेक ग्रामपंचायत काँग्रेसने आपला झेंडा लावला. यात शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांच्या बोरगाव शिवणफल येथे काँग्रेसचे सरपंच पदी सतराज कुलसंगे तर उपसरपंच पदी अनिल झाडे यांची निवड करण्यात आली. यामध्ये शिवसेना जिल्हाध्यक्षच्या गावात काँग्रेसचा झेंडा लावण्यात आल्याने. जिल्हाध्यक्ष नितीन मत्ते यांना आपल्या गावातच शिवसेनेची सत्ता बसवू शकले नाही. वरोरा भद्रावती मतदार संघातील बोरगाव शिवनफल ता.वरोरा येथे काँग्रेसचा झेंडा सरपंच संतराज नीलकंठ कुलसंगे, उपसरपंच अनिल वामन झाडे, सदस्य संगीता शालीक चौधरी, लक्ष्मी राहुल किनाके आणि पिजदूरा-मोवाडा गटग्रामपंचयात ता.वरोरा येथे सरपंच सुनिता रघुनाथ आत्राम, उपसरपंच अरुण झिंगुजी बरडे, सदस्य ईश्वर पावडे, जान्हवी लक्ष्मण सिंग बैस, मायाताई सुरेश झाडे व टेमुर्डा ता.वरोरा येथे काँग्रेस चा झेंडा सरपंच सुचिता ठाकरे, उपसरपंच श्रीमती विमल वाठोडे, सदस्य संजय घरत, सदस्य बेबीताई सुरेश टेकाम, सदस्य भारती संजय चंदनबटवे यांची हे विजयी झाले आहे.या विजयामुळे वरोरा भद्रावती मतदार संघातील काँग्रेस कार्यकत्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आहे. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी संपूर्ण विजयी उमेदवारांना शुभेच्या देऊन पुढे समाजातील शेवटच्या वर्गाचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले आहे.
देवरी तालुक्यातील निवडून आलेले सरपंच व उपसरपंचाचे अभिनंदन
देवरी : तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झालेले सरपंच व उपसरपंच
ग्रामपंचायत लोहारा- पन्नालाल परसराम चौधरी सरपंच,सुभद्रा अगळे उपसरपंच
ग्रामपंचायत फुटाना-कमलेश मोहन नंदेश्वर सरपंच,मिनाबाई रमेश देशमुख उपसरपंच
ग्रामपंचायत सावली-सरपंच- झुलनबाई पंधरे,उपसरपंच- राजेश्वरी बिंझलेकर
ग्रामपंचायत सुरतोली-सरपंच-कैलास मरस्कोले.उपसरपंच- सौ. मीना पातोडे
कोटजांभुरा-सरपंच – भूमाला मडावी,उपसरपंच- महेंद्र दुधनाग
देवाटोला–सरपंच-कैलाश कुंजाम,उपसरपंच- जगत नेताम
सिलापुर-सरपंच: गरिबा टेंभूरकर,उपसरपंच: रूबीना कुरेशी
ग्रामपंचायत शिरपूर-सरपंच: नितेश भेंडारकर,उपसरपंच: विनोद वरखडे
ग्रामपंचायत भरेगाव–सरपंच: लखन पंधरे,उपसरपंच: राजेंद्र मेंढे
वडेगाव–सरपंच अंजुताई बिसेन,उपसरपंच भोजराज पंधरे
घोनाड- सरपंच सोनू नेताम, उपसरपंच कुंता ताई बोरुले
कडिकसा -सरपंच रमसिलाबाई कोरेटी,उप-सरपंच अशोक नरेटी
मेहताखेडा-सरपंच कृष्णा सर्पा,उप-सरपंच कान्हा कुंजाम
ककोडी-सरपंच मिना दिलीप मडावि,उप-सरपंच भैयालाल जांभुलकर
पिंडकेपार-सरपंच यमुना बाई। शृगकार,उप-सरपंच देवानंद शहारे