काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचे गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप
काटोल या स्वतःच्या मतदारसंघात विकासाच्या बाबतीत गृहमंत्री अनिल देशमुख सपशेल फेल ठरले आहे..ते गृह मंत्री असताना ही काटोल, नरखेड या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत…. सट्टा, अवैध दारू सुरू असल्याचा गंभीर आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे.
काटोल, नरखेड मध्ये महिलांकडून ओरड आहे की गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात अवैध दारू कशी सुरू आहे.. अनेक ठिकाणी सट्टा आणि दारूचे अड्डे सुरू आहे.. म्हणजेच गृह मंत्र्यांचा वचक नाही किंवा त्यांचाच आश्रय या अवैध धंद्यांना असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे.
या बद्दल माझे काका आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलून काहीही साध्य होईल असे वाटत नाही… आजवर ते महिला सुरक्षेचा दिशा कायदा करू शकले नाही… राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विदर्भात काँग्रेसच्या, शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघात दौरे करून त्यांच्या पक्ष वाढीचे कामे करत आहेत, तर आम्हाला ही जनतेत जाऊन बूथ लेव्हल वर पक्ष वाढीचा अधिकार असल्याचं देशमुख म्हणाले सोबतच जनतेच्या आग्रहवर मी काटोल मतदारसंघात जिथे अनिल देशमुख आमदार आहे पुन्हा सक्रिय होणार आहे अशी घोषणाही आशिष देशमुख यांनी केली.