विधानपरिषदेसाठी १२ नावं जाहीर होताच सत्यजित तांबे यांचं सूचक ट्विट

Share This News

‘श्रद्धा और सबुरी’, काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण.

राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सातत्याने धुसफुस सुरू असतानाच विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली. नावांची शिफारस करताना सारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचं परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितलं. दरम्यान यादी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केलेलं ट्विट चर्चेत आहे.

१२ नावांची यादी राज्यपालांकडे सोपवण्यात आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी ‘श्रद्धा और सबुरी’ असं सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली आहे. सत्यजीत तांबे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्या जागेवरुन वाद सुरु असतानाही असंच ट्विट केलं होतं.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.